Tuesday, September 25, 2012

सूड ,सूड आणि सूड

सूड ,सूड आणि सूड 

जिणे हीन केले जयाने जगात ।
तया लेख शत्रू सदा हो मनात ।।
बहु सज्ज होई, त्वरे सूड घ्याया ।
सुडावीण ना मार्ग माने जगाया ।।७८।।

जगी सूड घेता वरी मान येते ।
अरी ध्वंसिता दस्यु होतात जेते ।।
प्रभावी सुडाची जिथे भावना ना ।
तिथे दुःख दारिद्र्य पीडी जनांना ।।७९।।

छळे वालुका मौतिकाचे किड्याला ।
किडा सिद्ध होतो तिला गाडण्याला ।।
सुडाचेच त्या मोती होतात गोल ।
सुडावीण जीवीत हो मातीमोल ।।८०।।

सुडाचे अधिष्ठान जेथे असे ते ।
जिथे दास्यता पार लोपून जाते ।।
असे सूड संजीवनी एक खास ।
मृतप्राय जे राष्ट्र झाले तयास ।।८१।।

सदा स्तब्ध राहून अन्याय साहे ।
न सूडास घ्याया कधी सज्ज राहे ।।
असा जो असे दीन त्या कोण साधू ।
म्हणाया धजे ? नीच तो नीच भोंदू ।।८२।।

                                           - नाना पालकर 


Sunday, April 8, 2012

गोवा ढोंगी प्रसंग

१  
सुभाष वेलिंगकर 

आपला सत्कार करवून घ्यावा, इतरांनी आपले कौतुक करावे,
 असे माणसाला वाटणे तसे फार चुकीचे नाही.
म्हटली तर हि तशी सहज प्रवृत्ती आहे.
समाजात काम करणाऱ्यांना तर आपली प्रतिष्ठा वाढविण्याचा हा राजमार्ग वाटतो.
इतरांच्या सबबी आडून ते आपली पाठ आपणच थोपटून घेत असतात.

समाज संघटनेचे काम करणाऱ्या लोकांनी मात्र असले कार्यक्रम आवर्जून टाळावेत,
असा पूर्वापार संकेत आहे.
सरळ सांगायचे  म्हणजे, सत्कार हि काम थांबविण्याची सामाजिक आज्ञा आहे.
' तू आता थकलास, केले तेवढे खूप झाले,तुझा आता समाजाला त्रास होतोय, पुरे तू आता थांब ',
असे म्हणत, समाज त्याला कार्य करण्यापासून दूर करतो.
सत्कार करून त्याच्या कामाची त्याला पोचपावती देतो.
शहाणे माणूस हा संकेत समजतात, आणि वानप्रस्थाश्रमात प्रवेश करतात.
अहंकारी व्यक्ती मात्र पूर्व सुकृताचे फेव्हीकोल करीत तिथेच चिकटून बसतात.
समाजाला मग मात्र त्यांना हाकलावे लागते.

एक माणूस होता.  ' परोपदेशे पांडित्य ' दुसऱ्याला भरपूर पांडित्य सांगणारा.
त्याला ' आदर्श ' पुरस्कार जाहीर झाला.
थोडाही विचलित न होता त्याने तो स्वीकारला.
पूर्वी हा पुरस्कार जेव्हा इतरांना मिळत असे तेव्हा हा त्यांच्यावर प्रचंड टीका करीत असे.
याला मिळाल्यावर मात्र हा पुरस्कार आदर्श झाला. असो......
यावर  काही जणांनी त्याचा सत्कार केला.
मक्ख चेहऱ्याने याने तो स्वीकारला.

साठाव्या वर्षी सेवानिवृत्ती म्हणून पुन्हा सत्कार करविण्यात आला.
मजा म्हणजे सत्कार झाल्यावर त्याने दोन वर्षे सेवावाढीसाठी अर्ज केला.
' सेवावाढ घेणे हा बढती मिळवीनाऱ्यावर अन्याय आहे, सरकारी पैशांचा अपव्यय आहे,
सरकारी चमचेच असली कामे करतात. '  हि आधीची भाषणे मात्र त्याने व्यवस्थित बासनात गुंडाळली.

 बासष्ठाव्या वर्षी सक्तीची निवृत्ती मिळाली.
इजा बिजा तिजा, सत्कार व्हायलाच हवा.
संकटे येऊनही पुन्हा मोठा सत्कार करविण्यात आला.
' श्रेयाचा मज नको लेशही, निर्माल्यात विरावे !  '
संगठन गीतातल्या ह्या ओळी व त्याचां अर्थ पुस्तकातच राहिला.
आणि मग.......
याचा सत्कार मग माझा का नको ?
सत्कारांचे पेवच फुटले !

परिणती....
परवाचा मजेशीर प्रसंग. जिंकला म्हणून एकाचा सत्कार झाला.
वास्तविक दुसऱ्याने मनाचा मोठेपणा दाखविला म्हणून हा जिंकला.
याच्या  विजयमालेत दुसऱ्याने आपली फुले ओवली म्हणून !
आकडेवारीचे फटाके तर आवाज करीतच सांगत होते.
सत्कार करायचा या दुसऱ्याचा, पण झाला याचा.
इतिहास जिंकलेल्यांचे चेले लिहीत असतात ना 


अवधूत कामत 
 एका कार्यक्रमाला जाण्याचा प्रसंग आला . बसून कार्यक्रम बघत होतो . बघताना लक्षात आले कि कार्यक्रमाचे आयोजक आपल्याच कुटुंबियांना पुढे पुढे करतायत . वास्तविक तो एका संघटनेचा कार्यक्रम . संघटनेचा संकेत असतो कि आपल्याशिवाय इतरांना पुढे करायचे . इतरांना संधी द्यायची . साहजिकच संघटना वाढत जाते . संघटनेतील कार्यकर्ते मजबूत होतात . कुंपणावरचे आत येतात आणि कार्यकर्ते बनतात . परिघावरचे कुंपणाजवळ सरकतात . संघटना वाढत जाते . 
     एक गोष्ट आठवली . खेते नावाचा एक माकडाचा भाईबंद आहे . त्याचे एक वैशिष्ट्य आहे . त्याचे ढुंगण लाल रंगाचे . तो म्हणे आपले ढुंगण पुन्हा पुन्हा पाहतो . त्याची स्तुती करतो  ' म्हजेच भोक तांबडे ' म्हणत स्वतः लालेलाल होतो . नार्सिसस कॉम्प्लेक्स म्हणतात त्याला . अशी माणसे समुद्रासारख्या विशाल संघटनेला एका डबक्याचे रूप देतात . कोण सांगणार यांना ?