Friday, August 16, 2013

गोवा लोकनेते

१  माथानी साल्धाना 

गोव्याचे पर्यटनमंत्री व वनमंत्री आणि कुठ्ठाळीचे आमदार
माथानी साल्ढाणा यांचे हृदय विकाराच्या झटक्याने दुखद
निधन झाले.परमेश्वर त्यांना सद्गती देवो अशी ईशचरणी प्रार्थना.

माथानी हे झुजारू नेते.
समाजातील अन्याय,अत्याचार यांच्या विरुद्ध ते सतत लढले.
सामान्य लोकांसाठी प्रस्थापितांविरुद्ध लढणे हे सोपे नसते.
त्याची दाहकता केवळ हा लढा लढणार्यालाच जाणवत असते.
ती सोसत,जीवनाच्या अंतापर्यंत हा लढा त्यांनी लढला.

मुख्यमंत्री श्री. मनोहर पर्रीकरांच्या मागच्या अविश्वास ठरावावेळी त्यांच्या
समतोल विवेकाचे उत्तुंग दर्शन गोव्याला घडले.
क्षुल्लक आमिषाने सरकारे पाडणाऱ्या गोवेकर आमदारी वृत्तीसमोर,
ते एक दीपस्थंभासारखे उभे ठाकले.
ते सरकार त्यांनी तत्वनिष्ठेच्या निकषांवर वाचविले.
इतिहासातील हे विरळा उदाहरण आहे.

भाजपमधला प्रवेश हा सुद्धा भ्रष्टाचाराविरुद्धाचा त्यांचा लढा होता असे,
निवडणूक काळात एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलले होते.
ह्या निवडणुकीत सत्याच्या बाजूने बलवान हिमालय सारखे ते उभे राहिले.
त्यांचे हे जाणे मनाला चटका लावणरे आहे.

गोव्याला बऱ्याच वर्षांनी लाभलेल्या स्थिर सरकारात मनाजोगे स्थान त्यांना मिळाले.
सतत संघर्ष करताना मनात जपलेली काही जनकल्याण बीजे लावण्याची संधीहि मिळाली.
त्या दृष्टीने ते कामालाही लागले होते. पण......
परमेश्वर त्यांच्या मृतात्म्यास  सद्गती देवो !